Suryakumar Yadav ची ग्रोइन शस्त्रक्रिया यशस्वी, पोस्ट शेअर करून दिली माहिती

दुखापतीमुळे सूर्यकुमार अफगाणिस्तानसोबत खेळलेल्या टी-20 मालिकेलाही मुकला आहे. दुखापतीनंतर सूर्यकुमार यादवच्या मांडीवर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. शस्त्रक्रिया करण्यासाठी सूर्यकुमार यादव जर्मनीला पोहोचले होता. सूर्यकुमारची शस्त्रक्रिया जर्मनीतील म्युनिक येथे झाली.

Suryakumar Yadav Surgery: भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Surya Kuamar Yadav) दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-20 मालिकेत टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली होती. या मालिकेतच सूर्यकुमार जखमी झाला. दुखापतीमुळे सूर्यकुमार अफगाणिस्तानसोबत खेळलेल्या टी-20 मालिकेलाही मुकला आहे. दुखापतीनंतर सूर्यकुमार यादवच्या मांडीवर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. शस्त्रक्रिया करण्यासाठी सूर्यकुमार यादव जर्मनीला पोहोचले होता. सूर्यकुमारची शस्त्रक्रिया जर्मनीतील म्युनिक येथे झाली. शस्त्रक्रियेनंतर, सूर्यकुमार यादव यांना आता एनसीएमध्ये पुनर्वसन प्रक्रियेला सामोरे जावे लागेल. मात्र, सूर्यकुमार यादव मैदानात कधी परतणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वृत्तानुसार, सूर्यकुमार यादव आयपीएल 2024 पूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकतो. त्यानंतर चाहत्यांना सूर्या फक्त आयपीएल 2024 मध्ये खेळताना दिसेल. (हे देखील वाचा: तिसर्‍या T20 मध्ये Virat Kohli चा दिसला सुपरमॅन अवतार, षटकार वाचवण्यासाठी केला असा प्रयत्न, सगळे झाले थक्क झाले, Watch Video)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement