2022 Best Performers In T20: सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमार हे यंदाच्या T20 मध्ये टीम इंडियाकडून सर्वोत्तम खेळाडू, पहा आकडेवारी

यावर्षी युवा फलंदाज सूर्यकुमार यादव आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून T20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

2022 Best Performers In T20: सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमार हे यंदाच्या T20 मध्ये टीम इंडियाकडून सर्वोत्तम खेळाडू, पहा आकडेवारी
Surya Kumar Yadav And Bhuvneshwar Kumar (Photo Credit - Insta)

2022 Best Performers In T20: अवघ्या काही तासांत 2022 हे वर्ष संपणार आहे. 2022 मध्ये टीम इंडियाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. यावर्षी युवा फलंदाज सूर्यकुमार यादव आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून T20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. सूर्यकुमार यादवने 31 टी-20 सामन्यात 46.56 च्या सरासरीने 1164 धावा केल्या आहेत. यादरम्यान सूर्यकुमार यादवने दोन शतके आणि 9 अर्धशतके झळकावली. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने 32 सामन्यात 37 विकेट घेतल्या आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 31, 2022 02:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).