SRH vs RR, IPL 2024 Toss Update: सनरायझर्स हैदराबादने राजस्थानविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या राजस्थानचा संघ जिंकल्यास प्लेऑफसाठी पात्र ठरेल. त्याचवेळी, सनरायझर्स संघ गेल्या दोन सामन्यांमध्ये रुळावरून घसरला आहे. त्यामुळे या सामन्यात बरेच काही पणाला लागणार आहे. पराभवामुळे त्यांचा पुढचा मार्ग कठीण होईल.
SRH vs RR, IPL 2024: आयपीएल 2024 च्या 50 व्या (IPL 2024) सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना राजस्थान रॉयल्सशी (SRH vs RR) होणार आहे. या सामन्यात हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही संघ आमनेसामने येतील. पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या राजस्थानचा संघ जिंकल्यास प्लेऑफसाठी पात्र ठरेल. त्याचवेळी, सनरायझर्स संघ गेल्या दोन सामन्यांमध्ये रुळावरून घसरला आहे. त्यामुळे या सामन्यात बरेच काही पणाला लागणार आहे. पराभवामुळे त्यांचा पुढचा मार्ग कठीण होईल. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकून प्रथम फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॅनसेन, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन
🚨 Toss Update 🚨@SunRisers win the toss and will be batting first against @rajasthanroyals
Follow the Match ▶️ https://t.co/zRmPoMjvsd#TATAIPL | #SRHvRR pic.twitter.com/VUCv2r7X9x
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 02, 2024 07:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

