SRH New Jersey 2023: सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2023 साठी त्यांची नवीन जर्सी केली लॉन्च (Watch Video)

मुंबई इंडियन्स ते लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल 2023 साठी त्यांच्या नवीन जर्सी लाँच केल्या आहेत. दरम्यान, एकेकाळचा चॅम्पियन संघ सनरायझर्स हैदराबादनेही गुरुवारी आपली नवीन जर्सी (SRH जर्सी 2023) लाँच केली आहे.

SRH New Jersey 2023 (Photo Credit - Twitter)

इंडियन प्रीमियर लीग 2023 साठी, सर्व संघ त्यांच्या नवीन जर्सी (Indian Premier League 2023) लाँच करत आहेत. मुंबई इंडियन्स ते लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल 2023 साठी त्यांच्या नवीन जर्सी लाँच केल्या आहेत. दरम्यान, एकेकाळचा चॅम्पियन संघ सनरायझर्स हैदराबादनेही गुरुवारी आपली नवीन जर्सी (Sunrisers Hyderabad) लाँच केली आहे. हैदराबादने संघाने यावेळी त्यांच्या जर्सीत अनेक बदल केले आहेत. फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादने आगामी आयपीएल हंगामासाठी आपल्या नवीन जर्सीला (SRH Jersey 2023) ऑरेंज आर्मर असे नाव दिले आहे. संघाच्या जर्सीची रचना हैदराबाद शहराच्या समृद्ध सांस्कृतिक वारशातून प्रेरित आहे. ऑरेंज हा तेलंगणा राज्याचा अधिकृत रंग आहे. या कारणास्तव, संघाने 2013 पासून सर्व हंगाम या रंगाने खेळले आहेत. यावेळी संघाच्या जर्सीमध्ये स्लीव्ह आणि खांद्यावर काळा आणि केशरी रंग देण्यात आला आहे. जे या जर्सीला सुंदर बनवत आहे.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now