SRH Beat PBKS: सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा दोन धावांनी केला पराभव, शशांक-आशुतोषने खेळली स्फोटक खेळी

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाबला प्रत्युत्तरात 20 षटकांत 6 गडी गमावून 180 धावा करता आल्या. पंजाबकडून शशांक सिंग आणि आशुतोष यांनी अप्रतिम खेळी खेळली पण ते संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत.

SRH Beat PBKS: सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा दोन धावांनी केला पराभव, शशांक-आशुतोषने खेळली स्फोटक खेळी

SRH vs PBKS, IPL 2024: आज आयपीएल 2024 च्या 23व्या (IPL 2024) सामन्यात पंजाब किंग्जचा सामना सनरायझर्स हैदराबादशी चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा दोन धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदांजी करताना हैदराबादने पंजाबसमोर धावांचे 182 धावांचे लक्ष्य ठेवले. सनरायझर्स हैदराबादचा युवा फलंदाज नितीश रेड्डीच्या 37 चेंडूत चार चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 64 धावांची खेळी केली. पंजाबकडून अर्शदीप सिंगने चार, तर सॅम कुरन आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाबला प्रत्युत्तरात 20 षटकांत 6 गडी गमावून 180 धावा करता आल्या. पंजाबकडून शशांक सिंग आणि आशुतोष यांनी अप्रतिम खेळी खेळली पण ते संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 09, 2024 11:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).