Sunil Narine ने 13 चेंडूत ठोकले T20 क्रिकेटच्या इतिहासातील दुसरे संयुक्त सर्वात वेगवान अर्धशतक, थोडक्यात बचावला युवराज सिंहचा विश्वविक्रम (Watch Video)

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू सुनील नारायणने 13 चेंडूत अर्धशतक ठोकले, जे T20 क्रिकेटच्या इतिहासातील दुसरे सर्वात जलद आहे. नारायणच्या या जलद खेळीनंतर भारताचा धडाकेबाज अष्टपैलु युवराज सिंहचा विश्वविक्रम थोडक्यात बचावला. सर्वात वेगवान टी-20 अर्धशतक करण्याचा विक्रम युवराज सिंहच्या नावावर आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने 2007 मध्ये केवळ 12 चेंडूत अर्धशतक केले होते.

Sunil Narine ने 13 चेंडूत ठोकले T20 क्रिकेटच्या इतिहासातील दुसरे संयुक्त सर्वात वेगवान अर्धशतक, थोडक्यात बचावला युवराज सिंहचा विश्वविक्रम (Watch Video)
सुनील नारायण (Photo Credit: Twitter)

वेस्ट इंडिजचा (West Indies) अष्टपैलू खेळाडू सुनील नारायणने (Sunil Narine) बुधवारी ट्वेंटी-20 क्रिकेटमधील संयुक्त दुसरे-जलद अर्धशतक ठोकून रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले. नारायणने बांगलादेश प्रीमियर लीग (Bangladesh Premier League) 2022 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मीरपूरच्या शेरे बांगला स्टेडियमवर चट्टोग्राम चॅलेंजर्सविरुद्ध कोमिल्ला व्हिक्टोरियन्सच्या डावाची सुरुवात करताना हा टप्पा गाठला. नारायणने त्याच्या दमदार खेळीत 5 चौकार आणि 6 षटकार ठोकले. नारायणने 13व्या चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, पण टी-20 क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक करण्याच्या जागतिक विक्रमापासून त्याला फक्त 1 चेंडू कमी पडला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या

Share Us