Ruturaj Gaikwad Fifty: भारताची वादळी सुरुवात, शुभमन गिल याच्यापाठोपाठ ऋतुराज गायकवाडचे अर्धशतक

टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजीला आले आणि 50 षटकांत 276 धावा करून सर्वबाद झाले. ऑस्ट्रेलियन संघाकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 52 धावा केल्या. टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या.

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळवला जात आहे. या सामन्यात केएल राहुल (KL Rahul) टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजीला आले आणि 50 षटकांत 276 धावा करून सर्वबाद झाले. ऑस्ट्रेलियन संघाकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 52 धावा केल्या. टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 277 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलनंतर ऋतुराज गायकवाडनेही अवघ्या 60 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. टीम इंडियाचा स्कोर 111/0 आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement