Asia Cup 2023 True Heroes: बक्षीस रकमेसह श्रीलंकेचा ग्राउंड स्टाफ मैदानात, आशिया कप स्पर्धेचे ठरले खरे नायक; पहा फोटो

चांगल्या कामगिरीमुळे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी श्रीलंकेच्या मैदानावरील कर्मचाऱ्यांसाठी 42 लाखांचे रोख बक्षीस दिले तसेच सिराजने मैदानावरील कर्मचाऱ्यांना सामनावीर पुरस्कार देण्याची घोषणा केली. सिराजला दिलेली रक्कम ग्राऊंड स्टाफकडे सुपूर्द करण्यात आली.

मोहम्मद सिराजच्या (Mohammad Siraj) (21/6) घातक गोलंदाजीच्या जोरावर भारताने रविवारी आशिया चषक फायनलमध्ये श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव (India Beat Sri Lanka) करून विक्रमी आठव्यांदा आशिया चषक विजेतेपद पटकावले. श्रीलंकेला 15.2 षटकांत अवघ्या 50 धावांत गुंडाळल्यानंतर भारताने 6.1 षटकांत 10 गडी राखून सामना जिंकला. परंतु या सामन्याचे खरे हिरो ठरले ते म्हणजे श्रीलंकेचा ग्राउंड स्टाफ ज्यांनी प्रत्येक वेळी पावसामुळे सामना पुर्ण होण्यासाठी पुरेपुर मेहनत घेतली. त्याच्या या चांगल्या कामगिरीमुळे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी श्रीलंकेच्या मैदानावरील कर्मचाऱ्यांसाठी 42 लाखांचे रोख बक्षीस दिले तसेच सिराजने मैदानावरील कर्मचाऱ्यांना सामनावीर पुरस्कार देण्याची घोषणा केली. सिराजला दिलेली रक्कम ग्राऊंड स्टाफकडे सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर पुर्ण  श्रीलंकेचा ग्राउंड स्टाफ बक्षीस रकमेसह मैदानात दिसुन आला.
पहा फोटो

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement