श्रीलंकेचा क्रिकेटपटू Tillakaratne Dilshan ला मिळाले ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व

तिलकरत्ने दिलशानची गणना श्रीलंकेच्या स्फोटक फलंदाजांमध्ये होत होती, त्याने आपल्या संघाला अनेक सामने जिंकून दिले.

श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू तिलकरत्ने दिलशानने (Tillakaratne Dilshan) ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व घेतले आहे. ऑस्ट्रेलियन खासदार जेसन वुड यांनी सोशल मीडियावर दिलशानने ऑस्ट्रेलियन नागरिकत्व मिळवल्याची माहिती दिली आहे. तिलकरत्ने दिलशानची गणना श्रीलंकेच्या स्फोटक फलंदाजांमध्ये होत होती, त्याने आपल्या संघाला अनेक सामने जिंकून दिले. “आजचा नागरिकत्व सोहळा श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू आणि श्रीलंकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तिलकरत्ने दिलशान यांच्या उपस्थितीने आणखी खास बनला आहे,” असे खासदाराने पोस्टमध्ये लिहिले आहे. त्याने पुढे लिहिले की, एकदिवसीय इतिहासात धावांचा पाठलाग करण्याच्या बाबतीत दिलशान हा श्रीलंकेचा सर्वोत्तम खेळाडू मानला जातो. 2011 च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकात 500 धावांसह सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याने केला आणि उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध शतक झळकावले. याव्यतिरिक्त, तो 2014 आयसीसी टी-20 विश्ववचषक जिंकण्याचा भाग होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jason Wood (@jason_wood_mp)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)