IND vs SL, Asia Cup 2022: सुपर 4 च्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन पहा
भारतीय संघाला पाकिस्तानकडून पाच विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा ४ गडी राखून पराभव केला.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया कप 2022 सुपर-4 चा तिसरा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीम स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सुपर-4 सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पाकिस्तानकडून पाच विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला.
दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
श्रीलंका : कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), दनुष्का गुणातिलका, पथुम निसांका, चारिथ अस्लंका, भानुका राजपक्षे, दासून शांका (कर्णधार), वनिंदू हसरंगा, चमिका करुणारतना, महेश थिक्शाना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका.