IND vs SL 3rd ODI: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना (IND vs SL 3rd ODI) आज कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिला सामना बरोबरीत सुटला, तर दुसरा सामना श्रीलंकेने 32 धावांनी जिंकला. आता रोहितसेनेकडे मालिका वाचवण्याचे लक्ष असणार आहे तर दुसरीकडे श्रीलंकेला भारताला पराभूत करुन इतिहास रचण्याची सुवर्ण संधी आहे. दरम्यान, श्रीलंकाने टाॅस जिकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतासमोर 249 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. श्रीलंकेसाठी सलामीवीर अविष्का फर्नांडोने 96 धावांची शानदार खेळी केली. टीम इंडियाकडून रियान परागने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 249 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला दुसरा धक्का लागला आहे. रोहित शर्मा 35 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 53/2
3RD ODI. 7.2: Dunith Wellalage to Rishabh Pant 4 runs, India 57/2 https://t.co/Lu9YkAmnek #SLvIND #3rdODI
— BCCI (@BCCI) August 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)