Omicron Scare: कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेतील Mzansi Super League टी-20 सलग दुसऱ्या वर्षी देखील रद्द
2020 ची आवृत्ती देखील महामारी दरम्यान लॉजिस्टिक आव्हानांमुळे रद्द करण्यात आली होती. बोर्डाने सांगितले की मझांसी सुपर लीगच्या जागी देशांतर्गत T20 चॅलेंज टूर्नामेंट आयोजित केली येईल ज्यामध्ये आठ प्रथम विभागीय संघ असतील.
दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) मझांसी सुपर लीग (टी-20 स्पर्धा कोरोना व्हायरसमुळे सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आल्याची पुष्टी क्रिकेट बोर्डाने सोमवारी केली. 2022 मझांसी सुपर लीग (Mzansi Super League) फेब्रुवारीमध्ये होणार होती परंतु CSA ने सांगितले की Omicron व्हेरियंटच्या उदयानंतर दक्षिण आफ्रिकेवर अनेक देशांनी लादलेल्या प्रवासी निर्बंधांमुळे स्पर्धेचे आयोजन करणे कठीण झाले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)