South Africa Beat India 1st T20I: दक्षिण आफ्रिकेने चाखली विजयाची चव, अटीतटीच्या सामन्यात भारतीय महिला संघाचा 12 धावांनी केला पराभव

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ यांच्यात आज तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 12 धावांनी पराभव केला आहे.

IND W vs SA W 1st T20I: भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ यांच्यात आज तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 12 धावांनी पराभव केला आहे. यासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 20 षटकांत 4 गडी गमावून 189 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी सलामीवीर तझमिन ब्रिट्सने धमाकेदार खेळी करत सर्वाधिक धावा केल्या. टीम इंडियासाठी राधा यादव आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला 20 षटकांत 4 गडी गमावून केवळ 177 धावा करता आल्या. टीम इंडियासाठी जेमिमाह रॉड्रिग्सने सर्वाधिक नाबाद 53 धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून अयाबोंगा खाका, नदिन डी क्लर्क, नॉनकुलुलेको म्लाबा आणि क्लो ट्रायॉन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. मालिकेतील दुसरा सामना 7 जुलै रोजी चेन्नई येथे संध्याकाळी 7 वाजल्यापासून खेळवला जाईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement