ENG vs SA T20 WC 2024 Super 8 Live Score Update: दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडसमोर ठेवले 164 धावांचे लक्ष्य, क्विंटन डी कॉक आणि डेव्हिड मिलर यांची स्फोटक खेळी

दोन्ही संघांमध्ये आज जो विजयी होईल तो उपांत्य फेरीत खेळणार हे जवळपास निश्चितच आहे. दरम्यान, इंग्लडंने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 163 धावा केल्या.

ENG vs SA T20 WC 2024 Super 8 Live Score Update: दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडसमोर ठेवले 164 धावांचे लक्ष्य, क्विंटन डी कॉक आणि डेव्हिड मिलर यांची स्फोटक खेळी

ENG vs SA T20 WC 2024 Super 8: आज टी-20 विश्वचषकात सुपर-8 मध्ये (T20 World Cup 2024 Super 8) इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (ENG vs SA) यांच्यात डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सामना (Darren Sammy National Cricket Stadium in St. Lucia) खेळवला जात आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना हा उच्च स्कोअरिंग असू शकतो. दोन्ही संघांकडे स्फोटक फलंदाजांची फौज आहे. जिथे इंग्लंडने सुपर-8 मध्ये वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. दक्षिण आफ्रिकेनेही अमेरिकेचा पराभव केला आहे. दोन्ही संघांमध्ये आज जो विजयी होईल तो उपांत्य फेरीत खेळणार हे जवळपास निश्चितच आहे. दरम्यान, इंग्लडंने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 163 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी सलामीवीर क्विंटन डी कॉकने सर्वाधिक 65 धावांची खेळी खेळली. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंड संघाला 20 षटकात 164 धावा करायच्या आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2024 09:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).