IND W vs ENG W, CWG 2022: स्मृती मंधानाने स्वत:चाच विक्रम मोडला, सर्वात कमी चेंडूत केले अर्धशतक पूर्ण

तिने 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले.

Smriti Mandhana (Photo Credit - Twitter)

सलामीवीर स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) हिने बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा 2022 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाला झंझावाती सुरुवात केली. या सामन्यात स्मृती मंधानाने पॉवरप्लेमध्येच आपले अर्धशतक पूर्ण केले होते. यासह तिने आपलाच एक जुना विक्रम मोडीत काढला आहे. स्मृती मंधाना ही भारतासाठी महिला टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारी फलंदाज आहे. स्मृती मंधानाने इंग्लंडविरुद्धच्या CWG सेमीफायनलमध्ये अवघ्या 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तिने 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान त्याचा स्ट्राइकरेट 217 पेक्षा जास्त होता. महिला टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी हे सर्वात जलद अर्धशतक आहे. इतकंच नाही तर स्मृती मंधानाच्या नावावर हा विक्रम आधीच नोंदवला गेला होता, जेव्हा तिने 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 24 चेंडूत हा पराक्रम केला होता.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)