SL vs WI 1st Test: सामन्यादरम्यान वेस्ट इंडिजचा पदार्पणवीर Jeremy Solozano याच्या डोक्याला दुखापत, रुग्णालयात केले दाखल
Galle येथील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी विंडीजचा पदार्पणवीर जेरमी सोलोझानोला क्षेत्ररक्षण करताना गंभीर दुखापत झाली आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. ही घटना सामन्याच्या 24 व्या षटकात घडली.
वेस्ट इंडिज (West Indies) संघ श्रीलंकेत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. Galle येथील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मैदानात मोठी दुर्घटना घडली. पहिली कसोटी खेळत असताना विंडीजचा पदार्पणवीर जेरमी सोलोजानोला (Jeremy Solozano) क्षेत्ररक्षण करताना गंभीर दुखापत झाली आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. जेरमी फॉरवर्ड शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करत होता. जेरमीने हेल्मेट घातले होते मात्र दुखापत गंभीर असल्याने त्याला रुग्णालयात पाठवावे लागले. ही घटना सामन्याच्या 24 व्या षटकात घडली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)