Shubman Gill Century: शुभमन गिलचे दमदार शतक, भारताची धावसंख्या सहा विकेट्सवर 170 धावा पार
नाणेफेक हारल्यानंतर बांगलादेशच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत आठ गडी गमावून 265 धावा केल्या. बांगलादेशकडून कर्णधार शकीब अल हसनने सर्वाधिक 80 धावा केल्या. टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
टीम इंडिया आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात आज आशिया कप 2023 चा (Asia Cup 2023) शेवटचा सुपर फोर सामना खेळला जात आहे. बांगलादेशचा संघ आधीच या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. यासोबतच टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली आहे. आता अंतिम फेरीत त्याचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला आपली बेंच स्ट्रेंथ तपासण्याची चांगली संधी आहे. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राउंड-4 च्या शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये 5 बदल करण्यात आले आहेत. दरम्यान, नाणेफेक हारल्यानंतर बांगलादेशच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत आठ गडी गमावून 265 धावा केल्या. बांगलादेशकडून कर्णधार शकीब अल हसनने सर्वाधिक 80 धावा केल्या. टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 266 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी निघालेल्या टीम इंडियाला दुसरा सहावा झटका बसला आहे. शुभमन गिलने आपले दमदार शतक झळकावले आहे. भारताचा स्कोर 171/6
A brilliant CENTURY by @ShubmanGill 👏👏
He brings up his 5th ODI 💯 off 117 deliveries.#TeamIndia #AsianCup2023 pic.twitter.com/l2RIiSHg6b
— BCCI (@BCCI) September 15, 2023
ASIA CUP 2023. WICKET! 37.4: Ravindra Jadeja 7(12) b Mustafizur Rahman, India 170/6 https://t.co/OHhiRDZM6W #INDvBAN
— BCCI (@BCCI) September 15, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 15, 2023 10:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

