Shreyas Iyer ने जिंकली चाहत्यांची मने, रस्त्यावर पैसे मागणाऱ्या 'बापा'ची केली आर्थिक मदत; व्हिडिओ होतोय व्हायरल
विश्वचषकापूर्वी अय्यरचे पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, श्रेयस अय्यरचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आर्थिक मदत करत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. श्रेयस अय्यर प्रॅक्टिसनंतर आपल्या गाडीतून निघाला होता गाडीजवळ मुलाला घेऊन बाप पैसे मागत असल्याचे दिसतेय.
भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या दुखापतीतून सावरला आहे. भारतीय संघ श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. मधल्या फळीत अय्यर भारतीय संघाचे ट्रम्प कार्ड असल्याचे सिद्ध झाले आहे. विश्वचषकापूर्वी अय्यरचे पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, श्रेयस अय्यरचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आर्थिक मदत करत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. श्रेयस अय्यर प्रॅक्टिसनंतर आपल्या गाडीतून निघाला होता गाडीजवळ मुलाला घेऊन बाप पैसे मागत असल्याचे दिसतेय. त्यावेळी अय्यर याने चौकशी करत त्यांना मदत केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
पहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)