Shreyas Iyer ने घेतला मोठा निर्णय, दुखापतीमुळे IPL 2023 आणि WTC मधून बाहेर

ESPNcricinfo च्या अहवालानुसार, भारतीय संघासाठी मधल्या षटकांमध्ये खेळणारा श्रेयस अय्यर IPL 2023 आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधून बाहेर पडला आहे. त्याच्या पाठीला दुखापत झाली आहे, त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असून तो 6 ते 7 महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहू शकतो.

Shreyas Iyer (Photo Credit - Twitter)

भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर आयपीएल 2023 आणि जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यात खेळू शकणार नाही. श्रेयसने त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. ESPNcricinfo च्या अहवालानुसार, भारतीय संघासाठी मधल्या षटकांमध्ये खेळणारा श्रेयस अय्यर IPL 2023 आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधून बाहेर पडला आहे. त्याच्या पाठीला दुखापत झाली आहे, त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असून तो 6 ते 7 महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दुखापतीमुळे तो पहिला कसोटी सामना खेळू शकला नाही. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत तो परतला, पण फलंदाजीत तो अप्रतिम कामगिरी करू शकला नाही. यानंतर त्याची दुखापत अधिक गंभीर झाली. त्यानंतर चौथ्या कसोटीत तो फलंदाजीसाठी आला नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement