IPL Auction 2025 Live

IND vs PAK: शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांची भारत-पाकमध्ये क्रिकेट सामने न घेण्याची केली मागणी, पंतप्रधान नरेंद्र मोदीनां लिहिले पत्र

दहशतवादी आणि खुनी पाकिस्तानशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, हे भारताने स्पष्ट करावे, असे ते म्हणाले.

Photo Credit - X

शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे (Anand Dube) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहून बीसीसीआयने भारत-पाकमध्ये (IND vs PAK) क्रिकेट सामने न खेळवण्याची मागणी केली आहे. तसेच, निष्पाप लोकांच्या बळी घेणाऱ्या दहशतवादी घटनांना जबाबदार असलेल्या पाकिस्तानवर प्रत्येक स्तरावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, एकीकडे पाकिस्तान आपल्या देशातील नागरिकांच्या रक्ताची होळी खेळण्यात मग्न आहे आणि दुसरीकडे आपण त्याच्यासोबत क्रिकेट खेळत आहोत, यापेक्षा दुर्दैव ते काय असू शकते. दहशतवादी आणि खुनी पाकिस्तानशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, हे भारताने स्पष्ट करावे, असे ते म्हणाले. जम्मू-काश्मीरमधील रियासी, डोडा आणि आता कठुआ येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी ज्या प्रकारे निरपराध लोकांची हत्या केली आहे, त्यावरून पाकिस्तानला योग्य धडा शिकवला पाहिजे, असे ते म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Asian News International (@ani_trending)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)