तिसऱ्या सामन्यातून Sanju Samson ला वगळल्यानंतर काँग्रेस खासदार Shashi Tharoor संतापले, Team India च्या रणनीतीवर प्रश्न केले उपस्थित
संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न दिल्यानंतर काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी ट्विटमध्ये भारतीय संघाच्या रणनीतीवर तसेच निवडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
IND vs NZ 3rd ODI 2022: भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनचा (Sanju Samson) न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला नाही. संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न दिल्यानंतर काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी ट्विटमध्ये भारतीय संघाच्या रणनीतीवर तसेच निवडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आपल्या ट्विटमध्ये शशी थरूर यांनी भारतीय संघाचे स्टँड-इन प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांच्या विधानाचा हवाला देत लिहिले की, ऋषभ पंतने चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे संघ त्याला पूर्ण पाठिंबा देईल. थरूर यांनी पुढे लिहिले की, ऋषभ पंत हा चांगला खेळाडू आहे, परंतु त्याच्या शेवटच्या 11 डावांपैकी 10 डावांमध्ये तो धावा करू शकला नाही. तर संजू सॅमसनची वनडेमध्ये सरासरी 66 आहे. गेल्या पाच डावांत त्याने सातत्यपूर्ण धावा केल्या, पण तो बेंचवर थांबला आहे. अशा परिस्थितीत या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.