KKR vs RR, IPL 2024: आयपीएल 2024 मधील 31 वा सामना (IPL 2024) कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. दरम्यान, राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना केकेआरने राजस्थानसमोर 224 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. केकेआरकडून सुनील नरेनने 109 धावांची खेळी खेळली. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे. नरेननंतर आंगकृष्ण रघुवंशीने सर्वाधिक 30 धावा केल्या. शेवटी रिंकू सिंग 9 चेंडूत 20 धावा काढून नाबाद परतला. रिंकूने एक चौकार आणि दोन षटकार मारले. तर राजस्थानकडून आवेश खान आणि कुलदीप सेन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थाला सहावा धक्का लागला आहे. राजस्थानचा स्कोर 178/7
Narine strikes back! Powell departs lbw for a 13-ball 26 ☝️
RR need 46 from 19 with three wickets in hand - Boult joins Buttler in the middle#KKRvRR #IPL2024 https://t.co/rqmbZ1gtdX
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 16, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)