Sanju Samson Century: संजू सॅमसनचे आफ्रिकेविरोधात शानदार शतक; भारताची धावसंख्या 200 च्या जवळ
संजू सॅमसने या सामन्यात शतक ठोकले असून सध्या तो 47 चेंडूत 100 धावाकरून खेळत आहे. आपल्या या खेळीत त्याने 9 षटकांर आणि 7 चौकार मारले आहेत. भारताची धावसंख्या ही 15 षटकानंतर 3 बाद 167 झाली असून तिलक वर्मा 33 धावा करून बाद झाला.
South Africa National Cricket Team vs Indian National Cricket Team, 1st T20I Match Live Score Update: दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील चार सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज 8 नोव्हेंबरपासून खेळवला जात आहे. उभय संघांमधील पहिला सामना डर्बनमधील (Durban) किंग्समीड (Kingsmead) येथे खेळवला जात आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशचा पराभव करून दक्षिण आफ्रिका संघ या मालिकेत प्रवेश करणार आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या खांद्यावर आहे. तर टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. गेल्या वेळी दोन्ही संघ आमनेसामने आले होते, टीम इंडियाने आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. यावेळी दक्षिण आफ्रिका घरच्या मैदानावर बदला घेण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, पहिल्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी आतापर्यंत चांगले प्रदर्शन केले आहे. संजू सॅमसने या सामन्यात शतक ठोकले असून सध्या तो 47 चेंडूत 100 धावाकरून खेळत आहे. आपल्या या खेळीत त्याने 9 षटकांर आणि 7 चौकार मारले आहेत. भारताची धावसंख्या ही 15 षटकानंतर 3 बाद 167 झाली असून तिलक वर्मा 33 धावा करून बाद झाला.
पाहा पोस्ट -
💯 for Sanju Samson - his second T20I hundred! 🙌 🙌
A 47-ball ton! 🔥 🔥
Back to back T20I tons for Sanju Samson 👌 👌
Live ▶️ https://t.co/0OuHPYbn9U#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/vP5EhJAyVL
— BCCI (@BCCI) November 8, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

