Mumbai Kaali-Peeli Taxi: सचिन तेंडुलकरने सांगितली काळ्या पिवळ्या टॅक्सीची शेवटची आठवण, व्हिडिओ शेअर करत म्हणाला...
अनेक मुंबईकरांचे या टॅक्सीचे अनोखे नाते आहे. अनेक मुंबईकरांच्या या काळ्या-पिवळ्या टॅक्सीबरोबर एक तरी एक गोड आठवण नक्कीच जोडलेली असेल. कारण मुंबईच्या रस्त्यावर 60 वर्षांपासून धावणाऱ्या या काळ्या-पिवळ्या टॅक्सीचा प्रवास कायमचा बंद झालेला आहे.
मुंबईत पूर्वी ओला, उबर यांसारख्या कॅब सेवा नव्हत्या. त्यावेळी काळ्या-पिवळ्या टॅक्सीने मुंबईकरांना प्रवासात खूप साथ दिली. त्यामुळे अनेक दशकांपासून ही काळी-पिवळी टॅक्सी सर्वसामान्यांसाठी वाहतुकीचे सोईचे साधन म्हणून ओळखली जात होती. अनेक मुंबईकरांचे या टॅक्सीचे अनोखे नाते आहे. अनेक मुंबईकरांच्या या काळ्या-पिवळ्या टॅक्सीबरोबर एक तरी एक गोड आठवण नक्कीच जोडलेली असेल. कारण मुंबईच्या रस्त्यावर 60 वर्षांपासून धावणाऱ्या या काळ्या-पिवळ्या टॅक्सीचा प्रवास कायमचा बंद झालेला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी काळ्या-पिवळ्या टॅक्सीबाबत विविध मिम्स, पोस्ट शेअर केल्या गेल्या आहेत. त्यात भारताचा 'मास्टर-ब्लास्टर' माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सी सेवेबाबत एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांची ही पोस्ट आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. सचिनने व्हिडिओ शेअर करत तिच्या शेवटच्या आठवणीची गोष्ट सांगितली आहे.
पाहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)