Global E-Cricket Premier League 2025: सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर बनली ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये मुंबई ग्रिझलीजची मालकीन; पोस्टद्वारे दिली माहिती
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग 2025 मध्ये मुंबई ग्रिझलीज संघाची मालकीण झाल्याची माहिती दिली आहे. साराने तिच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने तिच्या बालपणीचा एक फोटो देखील समाविष्ट केला आहे.
Global E-Cricket Premier League 2025: सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने (Sara Tendulkar) ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग 2025 मध्ये 'मुंबई ग्रिझलीज' (Mumbai Grizzlies) संघाची मालकीण असल्याची घोषणा केली आहे. साराने तिच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने तिच्या बालपणीचा एक फोटो देखील समाविष्ट केला आहे. ज्यामध्ये ती सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) आणि अंजली तेंडुलकर आणि भाऊ अर्जुनसोबत दिसत आहे. या भावनिक पोस्टमध्ये साराने लिहिले की, "क्रिकेट हा आमच्या घरात फक्त एक खेळ नाही तर एक जीवनशैली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी शांतपणे या खेळाबद्दलचे माझे प्रेम अनुभवत आले.. आणि आज, मी मुंबई ग्रिझलीजमध्ये मालक म्हणून सामील होत आहे हे जाहीर करताना मला खूप अभिमान आणि आनंद होत आहे. ही एक नवीन भूमिका आहे, एक नवीन अध्याय आहे, परंतु क्रिकेटवरील तेच जुने प्रेम आहे. चला हा प्रवास अविस्मरणीय बनवूया." साराच्या या इंस्टाग्राम पोस्टमध्ये, ती मुंबई ग्रिझलीजची जर्सी परिधान करताना देखील दिसत आहे.
सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)