Sachin Tendulkar ने घेतली मैत्रिणीचे प्राण वाचवणारे ट्राफिक पोलीस सुरेश धुमसे यांनी भेट; कौतुक करत मानले आभार

काही दिवसांपूर्वी महान फलंदाज सचिन तेंडुलकरची मैत्रीण अपघातात जखमी झाली होती

Sachin Tendulkar (Photo Credits: Getty Images)

काही दिवसांपूर्वी महान फलंदाज सचिन तेंडुलकरची मैत्रीण अपघातात जखमी झाली होती. एका ट्रॅफिक पोलिसाने प्रसंगावधान राखत तेंडुलकरच्या मैत्रिणीचे प्राण वाचवले. या कृत्याबद्दल सचिनने पीसी सुरेश धुमसे यांची भेट घेतली आणि त्यांचे कौतुक करत आभार मानले. धुमसे यांच्यामुळेच तेंडुलकरच्या मैत्रिणीला सांताक्रूझ पीएसटीएन जंक्शन येथे रस्ता अपघातानंतर नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात मदत झाली. सचिन तेंडुलकरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ट्रॅफिक पोलीस धुमसे यांचे कौतुक करत एक भावनिक संदेश लिहिला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now