Sachin Tendulkar: चाहत्यांचे प्रेम पाहून भावूक झाला सचिन तेंडूलकर, काय घडले नेमके पाहा (Watch Video)
त्याची क्रेझ चाहत्यांमध्ये अजूनही कायम आहे. भेटीनंतर, त्याने ट्विटरवर एक व्हिडिओ रिट्विट करत त्याच्या चाहत्यांचे भावनिक आभार मानले.
Viral Video: क्रिकेटचा देव म्हटला जाणारा भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) निवृत्तीला काही वर्षे झाली, पण तो कधी सर्व चाहत्यांच्या तर कधी मैदानावर चर्चेत राहतो. यावेळी आकाशामध्येही त्याच्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली, विमान प्रवासातून तो कुठेतरी जात असताना चाहत्यांनी त्याच्यासाठी सचिन, सचिन अशा घोषणाबाजी सुरू केली. त्याची क्रेझ चाहत्यांमध्ये अजूनही कायम आहे. भेटीनंतर, त्याने ट्विटरवर एक व्हिडिओ रिट्विट करत त्याच्या चाहत्यांचे भावनिक आभार मानले आणि सीट बेल्ट सिग्नल सुरू असल्याने त्यांना उभे राहता आले नाही म्हणून त्यांना अभिवादन करण्यासाठी न उठल्याबद्दल माफी मागितली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पहा व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)