IND vs AUS T20 WC 2024 Super 8: आज टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातला महत्वाचा सामना सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित आहे आणि हा सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश करेल, तर मागील सामना गमावलेल्या ऑस्ट्रेलियासाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सेंट लुसिया येथे खेळला जाणारा सुपर एट स्टेजचा सामना पावसामुळे थांबवण्यात आला आहे. पावसामुळे मैदान कव्हरने झाकले गेले असून दोन्ही संघांचे खेळाडू मैदान सोडले आहेत. भारताचा स्कोर 43/1
WT20 2024. 4.1: Pat Cummins to Rohit Sharma 6 runs, India 43/1 https://t.co/VN07Z4nKQO #T20WorldCup #AUSvIND
— BCCI (@BCCI) June 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)