ICC ODI Ranking: रोहित शर्माची चमकदार कामगिरी, आयसीसी वनडे क्रमवारीत घेतली मोठी झेप
आयसीसी वनडे क्रमवारीत रोहितने विराट कोहलीला (Virat Kohli) मागे टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय कर्णधाराला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत 5 स्थानांचा फायदा झाला आहे.
आयसीसीने बुधवारी ताजी वनडे क्रमवारी (ICC ODI Ranking) जाहीर केली. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी केल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी वाढ केली आहे. या शानदार कामगिरीनंतर रोहित फलंदाजी क्रमवारीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. आयसीसी वनडे क्रमवारीत रोहितने विराट कोहलीला (Virat Kohli) मागे टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय कर्णधाराला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत 5 स्थानांचा फायदा झाला आहे. ताज्या क्रमवारीत रोहित (719 रेटिंग गुण) थेट 11व्या वरून सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. कोहलीबद्दल बोलायचे झाले तर तो संयुक्तपणे 8 व्या क्रमांकावर आला आहे. तो इंग्लंडच्या डेविड मलानसोबत स्पॉट शेअर करत आहे. या दोघांशिवाय शुभमन गिल टॉप-10 मध्ये भक्कमपणे उभा आहे. त्याचे 818 रेटिंग गुण आहेत.
Big movement at the top of the @MRFWorldwide ODI Player Rankings for a host of @cricketworldcup stars 💥#CWC23https://t.co/oK31QUOz75
— ICC (@ICC) October 18, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 18, 2023 03:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

