On This Day: रोहित शर्माने या दिवशी एकदिवसीय क्रिकेटमध्ये केला होता मोठा विक्रम, श्रीलंकेविरुद्ध 173 चेंडूत केल्या 264 धावा
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 173 चेंडूंत 264 धावांची खेळी केली.
भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने (Rohit Sharma) 2014 मध्ये (13 नोव्हेंबर) या दिवशी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय इतिहासातील आतापर्यंतची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवली. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 173 चेंडूंत 264 धावांची खेळी केली. रोहितने वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला ज्याने 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध इंदूरमध्ये 219 धावा केल्या होत्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन द्विशतके नोंदवणारा तो पहिला क्रिकेटर बनला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)