Rohit Sharma 100 Meter Six: रोहित शर्माने स्टेडियमच्या छतावर मारला 100 मीटरचा षटकार, प्रेक्षकांची हटली नाही नजर, तुम्हीही पाहा व्हिडिओ

रोहितने मिचेल स्टार्कच्या एका षटकात 4 षटकार आणि एक चौकार मारला, तर पॅट कमिन्सच्या षटकात त्याने असा गगनचुंबी षटकार मारला की चेंडू स्टेडियमच्या छतावर पडला.

IND vs AUS T20 World Cup 2024 Super 8: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) स्फोटक फलंदाजी परतली आहे. सोमवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकातील सुपर-8 सामन्यात रोहितने धमाल उडवली. आपल्या स्फोटक फलंदाजीच्या स्टाईलने दिसणाऱ्या रोहितने ऑस्ट्रेलियाच्या स्टार गोलंदाजांचा धुव्वा उडवला. रोहितने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. यादरम्यान त्याने मिचेल स्टार्कच्या एका षटकात 4 षटकार आणि एक चौकार मारला, तर पॅट कमिन्सच्या षटकात त्याने असा गगनचुंबी षटकार मारला की चेंडू स्टेडियमच्या छतावर पडला.

पाहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now