Rohit Sharma Got Emotional: सेमी फायनलमधल्या शानदार विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा झाला भावूक

टीम इंडियाने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडच्या संघापुढे विजयासाठी 172 धावांचे आवाहन ठेवले होते.

टीम इंडियाच्या (Team India) फलंदाजी आणि गोलंदाजीतील सांघिक कामगिरीमुळे भारतीय संघाने बलाढ्य इंग्लंडच्या संघाचा 68 धावांनी पराभव केला. या विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार आणि या संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) भावूक होताना दिसला. मॅच संपल्यानंतर रोहित शर्मा बाहेरच्या खुर्चीवर बसून होता. एक-एक खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये जात होता. ज्यावेळी विराट कोहली हा रोहित शर्माच्या खुर्चीजवळ आला आणि त्याने रोहितला हात मिळवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रोहित शर्मा कमालीचा भावूक झाला. त्याचा हात डोळ्यांवर गेला आणि त्याने अश्रू पुसले.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement