Rohit Sharma New Record: रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, 200 झेल घेणारा ठरला पाचवा भारतीय

बांगलादेशविरुद्ध 1 झेल घेत कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 200 झेल पूर्ण केले आहेत. भारताचे 14 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या अक्षर पटेलच्या शेवटच्या चेंडूवर मेहदी हसन मिराजने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये रोहितच्या हातात पडला.

टीम इंडिया आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात आज आशिया कप 2023 चा (Asia Cup 2023) शेवटचा सुपर फोर सामना खेळला जात आहे. बांगलादेशचा संघ आधीच या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. यासोबतच टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली आहे. आता अंतिम फेरीत त्याचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. दरम्यान, बांगलादेशविरुद्ध 1 झेल घेत कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 200 झेल पूर्ण केले आहेत. भारताचे 14 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या अक्षर पटेलच्या शेवटच्या चेंडूवर मेहदी हसन मिराजने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये रोहितच्या हातात पडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 झेल घेणारा रोहित शर्मा हा 5वा भारतीय क्षेत्ररक्षक ठरला आहे. रोहित शर्माने 497 डावात ही कामगिरी केली आहे. रोहित शर्मापूर्वी राहुल द्रविडने 334, विराट कोहलीने 303, मोहम्मद अझरुद्दीनने 261 आणि सचिन तेंडुलकरने 256 झेल घेतले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement