IND vs SA 3rd T20: ऋतुराज गायकवाड-इशान किशन यांची शानदार खेळी, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले 180 धावांचे लक्ष्य

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 179 धावा केल्या. टीम इंडियासाठी सलामीवीर ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 57 धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून ड्वेन प्रिटोरियसने दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात 180 धावा करायच्या आहेत.

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज विशाखापट्टणम येथील डॉ वायएस राजशेखर रेड्डी ACA VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 179 धावा केल्या. टीम इंडियासाठी सलामीवीर ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 57 धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून ड्वेन प्रिटोरियसने दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात 180 धावा करायच्या आहेत.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement