Rishabh Pant Trolled: 'स्टाईल मारण्याऐवजी खेळावर लक्ष दे' खराब स्टंपिंगमुळे ऋषभ पंतचा नेटकऱ्यांनी घेतला जोरदार क्लास, पाहा

खरं तर, ऋषभ पंतने (Rishabh Pant) त्याच्या शैलीतील फटकेबाजीमुळे श्रीलंकेचा फलंदाज महिष थेक्षाना स्टंपिंग करण्याची सोपी संधी गमावली.

Photo Credit - X

IND vs SL 3rd ODI: श्रीलंकेने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 110 धावांनी पराभव केला (India Beat Sri Lanka) आहे. श्रीलंकेने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. 1997 नंतर प्रथमच श्रीलंकेने भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली आहे. यादरम्यान, भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत त्याच्या खराब यष्टिरक्षणामुळे चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. खरं तर, ऋषभ पंतने (Rishabh Pant) त्याच्या शैलीतील फटकेबाजीमुळे श्रीलंकेचा फलंदाज महिष थेक्षाना स्टंपिंग करण्याची सोपी संधी गमावली. या सामन्यात श्रीलंकेच्या डावाच्या 49व्या षटकात ही घटना पाहायला मिळाली. कुलदीप यादवच्या या षटकात महिष थेक्षाना क्रीजच्या खूप पुढे गेला होता आणि पंतकडे स्टंपिंग करण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घेतला. त्यामुळे महिष थेक्षाना क्रीझवर परतला आणि भारताला ही विकेट मिळवता आली नाही. पंतच्या या खराब स्टंपिंगमुळे आता सोशल मीडियावर त्याच्यावर टीका होत आहे.

ऋषभ पंतचा नेटकऱ्यांनी घेतला जोरदार क्लास

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)