Rishab Pant To Miss IPL: अपघातानंतर ऋषभ पंत आयपीएल खेळण्याची शक्यता कमी, डाॅक्टरांनी दिली ही माहिती

जिथे बीसीसीआयची वैद्यकीय टीम ऋषभ पंतच्या लिगामेंटवर उपचार करेल. या दरम्यान AIIMS ऋषिकेश म्हणाले, ऋषभ पंतला लिगामेंटच्या दुखापतीतून बरे होण्यासाठी किमान 3-6 महिने लागतील.

Rishab Pant To Miss IPL: अपघातानंतर ऋषभ पंत आयपीएल खेळण्याची शक्यता कमी, डाॅक्टरांनी दिली ही माहिती
Rishabh Pant (Photo Credit - ANI)

Rishab Pant To Miss IPL: शुक्रवारी कार अपघातात जखमी झालेल्या टीम इंडियाचा (Team India) अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला (Rishabh Pant) चांगल्या उपचारांसाठी मुंबईला (Mumbai) हलवले जाऊ शकते. जिथे बीसीसीआयची वैद्यकीय टीम ऋषभ पंतच्या लिगामेंटवर उपचार करेल. या दरम्यान AIIMS ऋषिकेश म्हणाले, ऋषभ पंतला लिगामेंटच्या दुखापतीतून बरे होण्यासाठी किमान 3-6 महिने लागतील. जर ते गंभीर असेल तर ते आणखी असू शकते, त्यामुळे त्याची आयपीएल खेळण्याची शक्यता कमी असु शकते. 30 डिसेंबर रोजी रुरकीजवळ कार अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला होता. जेव्हा त्याची कार दुभाजकाला धडकली आणि आग लागली. यादरम्यान पंतच्या कपाळावर, पाठीवर आणि पायाला खूप दुखापत झाली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 31, 2022 01:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).