Nepal: बलात्काराचा आरोपी क्रिकेटपटू संदीप लामिछानेला दिलासा, 20 लाखांच्या जामिनावर सुटका

त्याने 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीसाठी पदार्पण केले होते.

Photo Credit - Twitter

Nepal: नेपाळमधील एका न्यायालयाने बलात्काराचा आरोपी स्टार क्रिकेटर संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) याच्या जामिनावर सुटका करण्याचा आदेश जारी केला आहे. उद्या त्याच्या परदेश दौऱ्यावर काही अटींसह 20 लाख रुपयांच्या जामिनावर त्याची सुटका होणार आहे. खर तर नेपाळी क्रिकेटपटू संदीप लामिछाने याच्यावर काठमांडू येथील एका हॉटेलच्या खोलीत 17 वर्षीय तरुणीने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या किशोरवयीन मुलीने गौशाळा महानगर पोलीस सर्कलमध्ये दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आरोप केला आहे की ऑगस्ट 2022 मध्ये 22 वर्षीय लामिछानेने हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला. 21 ऑगस्ट रोजी संदीप लामिछाने याने मुलीला काठमांडू आणि भक्तपूर येथे विविध ठिकाणी नेले. त्याच रात्री काठमांडूतील एका हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला. संदीप लामिछाने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळणारा नेपाळचा पहिला खेळाडू आहे. त्याने 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीसाठी पदार्पण केले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)