RCB Beat GT, IPL 2024 52th Match: रोमहर्षक सामन्यात आरसीबीचा विजय, गुजरातचा चार गडी राखून केला पराभव, डुप्लेसिसची 64 धावांची तुफानी खेळी
आयपीएल 2024 चा 52 वा (IPL 2024) सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स (RCB vs GT) यांच्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात आरसीबीने गुजरातचा चार विकेट राखून पराभव केला आहे.
RCB vs GT, IPL 2024 52th Match: आयपीएल 2024 चा 52 वा (IPL 2024) सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स (RCB vs GT) यांच्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात आरसीबीने गुजरातचा चार विकेट राखून पराभव केला आहे. तत्तपुर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ 19.3 षटकांत अवघ्या 147 धावा करून अपयशी ठरला. गुजरात टायटन्ससाठी शाहरुख खानने सर्वाधिक 37 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी विजयकुमार विशाक, मोहम्मद सिराज आणि यश दयाल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 13.4 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी सलामीवीर फाफ डू प्लेसिसने 64 धावांची तुफानी खेळी केली. गुजरात टायटन्सकडून जोशुआ लिटलने सर्वाधिक चार बळी घेतले.
Match 52. Royal Challengers Bengaluru Won by 4 Wicket(s) https://t.co/WEifqAaa8z #TATAIPL #IPL2024 #RCBvGT
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 04, 2024 10:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

