RCB vs PBKS Match, IPL 2025 Toss Update: पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकली; प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
अखेर पाऊस थांबला असून सामन्याची नाणेफेक झाली आहे. या हंगामात, आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहेत. तर, पंजाब किंग्जची कमान श्रेयस अय्यरच्या खांद्यावर आहे.
RCB vs PBKS Match, IPL 2025 Toss Update: बेंगळुरूमध्ये सकाळपासूनच पावसाचे सावट होते. पावसामुळे तेथे आरसीबी आणि पंजाब यांच्यातील टॉसही वेळेत होऊ शकला नव्हता. इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 34 वा सामना आज शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात आयोजित करण्यात आला आहे. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. सामन्यात पावसाने हजेरी लावल्याने क्रीकेट चाहत्यांमध्ये मोठे नाराजी आहे. बेंगळुरूमध्ये पावसामुळे टॉसही वेळेत होऊ शकला नव्हता. काहीवेळापूर्वी पाऊस थांबला. यामुळे नाणेफेक झाली आहे. पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकली. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाऊस थांबल्यानंतर एम चिन्नास्वामी स्टेडियमवर ग्राउंड स्टाफकडून मैदान खेळण्यासाठी तयार करण्यात आले. त्यामुळे उशीरा सामना सुरू झाला. गुणतालीकेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या स्थानावर आहे आणि पंजाब संघ चौथ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांनी 6-6 सामने खेळले आहेत आणि 4-4 असे जिंकले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)