RCB's Fans Signature Jersey: लखनौविरुद्ध सामन्यापूर्वी आरसीबीच्या नव्या जर्सीचे अनावरण; जर्सीवर चाहत्यांच्या स्वाक्षऱ्यांमध्ये दिसणार खेळाडू (Video)

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध इंडियन प्रीमियर लीग 2025 सामन्यापूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने चाहत्यांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या त्यांच्या खास जर्सीचे अनावरण केले.

PC-X

RCB's Fans Signature Jersey: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने नुकतच सोशल मीडियावर 20 मिलीयन फोलोअर्सचा टप्पा पार केला. आयपीएलमध्ये (IPL 2025) सर्वाधिक चाहते असलेला हा एकमेव संघ आहे. आरसीबीच्या चाहत्यांच्या आनंद आता द्विगूणीत होणार आहे. खेळाडू सुयश शर्मा, रजत पाटीदार, भुवनेश्वर कुमार, फिल साल्ट आणि यश दयाल यांच्यासह सह सर्व खेळाडू चाहत्यांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या जर्सीत दिसणार आहेत. स्टार स्पोर्ट्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, आरसीबी खेळाडूंनी त्यांची जर्सी प्रदर्शित केली. ज्यात वर्षानुवर्षे सतत पाठिंबा आणि प्रेम दिल्याबद्दल आभार मानले. सलग दुसऱ्या हंगामात प्लेऑफसाठी पात्र ठरल्यानंतर, आरसीबीकडे अंतिम विजेतेपद जिंकण्याची आशा आहे. त्यांचा शेवटचा लीग स्टेज सामना मंगळवारी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध होईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement