IPL 2024: ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी RCB ने खेळली मोठी खेळी, 'या' अनुभवी खेळाडूला केले मुख्य प्रशिक्षक

विराट कोहलीच्या संघाने पुढील हंगामासाठी अँडी फ्लॉवरची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आयपीएल 2023 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक असलेले हे अनुभवी खेळाडू आता पुढील हंगामात आरसीबीसाठी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करतील.

Andy Flower RCB New Coach: आयपीएल 2024 ची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. पुढील हंगामापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मोठी खेळी केली आहे. विराट कोहलीच्या संघाने पुढील हंगामासाठी अँडी फ्लॉवरची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आयपीएल 2023 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक असलेले हे अनुभवी खेळाडू आता पुढील हंगामात आरसीबीसाठी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करतील. अँडी फ्लॉवरचा लखनऊ सोबतचा करार आयपीएल 2023 च्या समाप्तीनंतर संपुष्टात आला, त्यानंतर अनेक फ्रँचायझी अनुभवी खेळाडूशी प्रशिक्षकासाठी बोलणी करत आहेत. राजस्थान रॉयल्स संघानेही त्याच्याशी चर्चा केली, पण शेवटी आरसीबीने त्याला साथ दिली. फ्लॉवरने आयपीएलच्या सलग दोन मोसमात लखनौ संघाला प्लेऑफमध्ये नेले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement