RCB Fans Tearing MS Dhoni's CSK Jersey: संतापजनक! आरसीबी चाहत्याने सीएसके चाहत्याची एमएस धोनीच्या 7 नंबरची जर्सी फाडली (Viedo)
आयपीएल 2025 मध्ये 3 मे रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आरसीबी विरुद्ध सीएसके हाय-व्होल्टेज सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा अवघ्या दोन धावांनी पराभव करून विजय मिळवला. मैदानाबाहेरही क्रिकेटचा प्रचंड उत्साह दिसून आला. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
RCB Fans Tearing MS Dhoni's CSK Jersey: आयपीएल 2025 मध्ये 3 मे रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आरसीबी (RCB) विरुद्ध सीएसके (CSK) हाय-व्होल्टेज सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा अवघ्या दोन धावांनी पराभव करून विजय मिळवला. मैदानाबाहेरही क्रिकेटचा प्रचंड उत्साह दिसून आला. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सामन्यानंतर काही प्रेक्षकांच्या कृतींमुळे खेळाच्या भावनेला गालबोट लागले. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये, आरसीबीचे चाहते सीएसके समर्थकांशी गैरवर्तन करताना दिसले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका आरसीबी चाहत्याने एमएस धोनीची सीएसकेची जर्सी फाडली (MS Dhoni's CSK Jersey). जी सीएसके चाहत्याने घातली होती. त्यानंतर, आरसीबी समर्थकांचा एक गट रस्त्यावर एका सीएसके चाहत्याला घेरताना दिसला. या घटनेवर सोशल मीडियावर बरीच टीका होत आहे.
आयपीएल 2025 च्या सामन्यानंतर एमएस धोनीची जर्सी फाडली
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)