Ravindra Jadeja New Record: रवींद्र जडेजाने रचला इतिहास, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2000 धावा आणि 200 बळी घेणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू

प्रथम फलंदाजी करत बांगलादेशने आपले सहा विकेट गमावले आहे. बांगलादेशविरुद्ध सहाव्या फलंदाजाला बाद करुन रवींद्र जडेजाने इतिहास रचला आहे.

Ravindra Jadeja New Record: रवींद्र जडेजाने रचला इतिहास, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2000 धावा आणि 200 बळी घेणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू

टीम इंडिया आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात आज आशिया कप 2023 चा (Asia Cup 2023) शेवटचा सुपर फोर सामना खेळला जात आहे. बांगलादेशचा संघ आधीच या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. यासोबतच टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली आहे. आता अंतिम फेरीत त्याचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला आपली बेंच स्ट्रेंथ तपासण्याची चांगली संधी आहे. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये 5 बदल करण्यात आले आहेत. प्रथम फलंदाजी करत बांगलादेशने आपले सहा विकेट गमावले आहे. बांगलादेशविरुद्ध सहाव्या फलंदाजाला बाद करुन रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) इतिहास रचला आहे.एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2000 धावा आणि 200 बळी घेणारा रवींद्र जडेजा कपिल देवनंतर दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 15, 2023 05:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).