Ranji Trophy 2022 Quarter-Final: पृथ्वी शॉच्या नेतृत्वात मुंबईचा ‘महा’ विक्रम, उत्तराखंडचा 725 धावांनी उडवला धुव्वा

या विजयासह मुंबईने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक फरकाने विजय नोंदवला. 1929-30 च्या मोसमात न्यू साउथ वेल्सचा क्वीन्सलँडवर 685 धावांचा विजय हा यापूर्वीचा सर्वोच्च होता. तसेच रणजीत बंगालने 1953-54 मध्ये ओरिसाचा 540 धावांनी पराभव केला होता.

सरफराज खान मुंबई रणजी करंडक 2022 (Photo Credit: Twitter)

रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) 2022 च्या दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये मुंबईचा (Mumbai) सामना उत्तराखंडशी (Uttrakhand) झाला. या सामन्यात मुंबईने 725 धावांनी विजय मिळवत नवा विश्वविक्रम नोंदवला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये (First Class Cricket) आतापर्यंत कोणत्याही संघाने इतक्या मोठ्या फरकाने विजय मिळवला नव्हता. यासह पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली मुंबईने चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीत जागा निश्चित केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)