Ranji Trophy 2022 Quarter-Final: 21 वर्षीय मुंबईकर फलंदाजाची कमाल, प्रशिक्षकाच्या 28 वर्षाच्या जुन्या विक्रमाशी केली बरोबरी

Ranji Trophy 2022: मुंबईचा फलंदाज सुवेद पारकर प्रथम श्रेणी पदार्पणात द्विशतक झळकावणारा केवळ 12वा भारतीय ठरला. 21 वर्षीय खेळाडूने उत्तराखंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या डावात मुंबईला 600 पेक्षा जास्त धावा करण्यात मदत केली. राज्य संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदारनंतर रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण करत द्विशतक करणारा उवेद मुंबईचा दुसराच फलंदाज ठरला.

सुवेद पारकर (Photo Credit: Twitter)

Ranji Trophy 2022 Quarter-Final: रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळत आहे. 21 वर्षीय सुवेद पारकरने (Suved Parkar) मुंबई आणि उत्तराखंड यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात इतिहास रचला आहे. सुवेदने पदार्पणाच्या सामन्यात द्विशतक झळकावत प्रशिक्षक अमोल मजुमदार यांच्या विक्रमाची बरोबरी केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now