Ranji Trophy 2022: रणजी करंडक पुन्हा रुळावर, दोन टप्प्यात होणार स्पर्धा, IPL नंतर बाद फेरी; BCCI सचिव जय शाह यांनी केला शिक्कामोर्तब
IPL 2022 च्या आधी आणि नंतर - दोन टप्प्यांत होणारी रेड-बॉल देशांतर्गत स्पर्धा रणजी ट्रॉफी अखेर रुळावर आली आहे. BCCI सचिव जय शाह यांनी पुष्टी केली की लीग-टप्प्याचे सर्व सामने पहिल्या टप्प्यात आयोजित केले जातील. यापूर्वी, बीसीसीआयने वाढत्या कोविड-19 प्रकरणांमुळे रणजी ट्रॉफी पुढे ढकलली होती. रणजी ट्रॉफी आणि कर्नल सीके नायडू ट्रॉफी स्पर्ध या वर्षी जानेवारीमध्ये सुरू होणार होती.
बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी शुक्रवारी सांगितले की, या हंगामात रणजी करंडक (Ranji Trophy) दोन टप्प्यात होणार आहे, ज्यामध्ये सर्व लीग-टप्प्याचे सामने पहिल्या टप्प्यात होतील. “बोर्डाने या मोसमात रणजी करंडक दोन टप्प्यात आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात, आम्ही लीग टप्प्यातील सर्व सामने पूर्ण करण्याची योजना आखत आहोत, तर बाद फेरी IPL नंतर जूनमध्ये होणार आहे. माझी टीम महामारीमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या जोखमीला कमी करण्यासाठी, त्याच वेळी अत्यंत स्पर्धात्मक रेड-बॉल क्रिकेट स्पर्धा सुनिश्चित करण्यासाठी जवळून काम करत आहे,” जय शहा यांनी अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)