IPL 2024 Point Table: राजस्थानने मुंबईचा सहा विकेटने केला पराभव, गुणतालिकेत घेतली अव्वल स्थानी झेप

राजस्थानचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय आहे. तर मुंबई इंडियन्सचा हा सलग तिसरा पराभव आहे. मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानावरही विजय मिळवता आला नाही. मुंबईने दिलेले 126 धावांचे लक्ष्य राजस्थानने 15.3 षटकांत 4 गडी गमावून पूर्ण केले. राजस्थानकडून रियान परागने शानदार खेळी केली.

IPL 2024 Point Table: राजस्थानने मुंबईचा सहा विकेटने केला पराभव, गुणतालिकेत घेतली अव्वल स्थानी झेप

MI vs RR, IPL 2024 14th Match: आयपीएल 2024 मधील 14 वा (IPL 2024) सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स (RR vs MI) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. राजस्थानने हा सामना 6 विकेटने जिंकला. राजस्थानचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय आहे. तर मुंबई इंडियन्सचा हा सलग तिसरा पराभव आहे. मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानावरही विजय मिळवता आला नाही. मुंबईने दिलेले 126 धावांचे लक्ष्य राजस्थानने 15.3 षटकांत 4 गडी गमावून पूर्ण केले. राजस्थानकडून रियान परागने शानदार खेळी केली. रायनने 39 चेंडूत 54 धावांची खेळी खेळली, या खेळीत रायनने 5 चौकार आणि 3 शानदार षटकार ठोकले. मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजी करताना आकाश मधवालने सर्वाधिक 3 बळी घेतले. या विजयानंतर राजस्थानने सहा गुणांसह गुणतालिकेत पहिले स्थान गाठले. त्याचबरोबर मुंबईला या स्पर्धेत आतापर्यंत पहिला विजय मिळवता आलेला नाही आणि ते 10व्या स्थानावर आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 01, 2024 11:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).