Rajasthan Beat Lucknow: राजस्थानने लखनौचा केला 20 धावांनी पराभव, राहुल आणि पूरणची अर्धशतकी खेळी वाया, सॅमसन ठरला हिरो
राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स (RR vs LSG) यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात राजस्थानने 20 धावांनी सामना जिंकला आहे.
RR vs LSG, IPL 2024 4th Match: आयपीएल 2024 चा (IPL 2024) चौथा सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स (RR vs LSG) यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात राजस्थानने 20 धावांनी सामना जिंकला आहे. तत्तपुर्वी, राजस्थानने टाॅस जिंकून प्रथम फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना राजस्थानने लखनौसमोर 194 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. राजस्थानसाठी कर्णधार संजू सॅमसनने शानदार फलंदाजी करत 82 धावांची नाबाद खेळी केली. लखनौकडून नवीन-उल-हकने सर्वाधिक दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाला 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 173 धावा करता आल्या. लखनौ सुपर जायंट्सकडून निकोलस पुरनने सर्वाधिक 64 नाबाद धावांची खेळी खेळली. राजस्थान रॉयल्सकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक दोन बळी घेतले.
Rajasthan Royals (193/4) beat Lucknow Super Giants (173/6) by 20 runs in Jaipur
Pooran 64*, Rahul 58; Boult 2/35#RRvsLSG
HIGHLIGHTS: https://t.co/KGq1DJgl4q pic.twitter.com/hRAj4avwfK
— TOI Sports (@toisports) March 24, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 24, 2024 07:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

