'मुंबईत जेव्हा तिकिट मिळणार नाही... मला माहित आहे कोणाला संपर्क करावा'; वानखेडे स्टेडियममध्ये Rohit Sharma Stand चे अनावरण होताच Rahul Dravid कडून हिटमॅनला शुभेच्छा (Video)

मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये रोहित शर्माच्या नावावर असलेल्या स्टँडबद्दल राहुल द्रविडने आपल्या भावना व्यक्त केल्या.

Rohit Sharma And Rahul Dravid (Photo Credit - Twitter)

Rahul Dravid on Rohit Sharma Stand: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक आणि महान फलंदाज राहुल द्रविडने मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये रोहित शर्माच्या नावावर असलेल्या स्टँडबद्दल आपले विचार मांडले. आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) विनोदी पद्धतीने सुरुवात केली, "रोहित तू अंदाजे त्या स्टँडमध्ये इतके षटकार मारलेस की एका स्टॅंडचे नाव तुझ्या नावावर ठेवावे लागले". त्यानंतर राहुल द्रविडने रोहित शर्मा (Rohit Sharma) स्टँडसाठी हिटमॅनचे अभिनंदन केले आणि म्हटले की रोहीतला मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळायला आणि ती उत्तम कामगिरी करायला आवडले आहे. त्याशिवाय जेव्हा तिकीटांची मोठी अडचण येईल तेव्हाचा प्रसंग सांगताना अडचण कशी सोडवू हे देखील राहुल द्रविडने सांगितले आणि म्हटले की, "मुंबईत जेव्हा माझ्याकडे तिकिटे कमी पडतील, तेव्हा आता तुमच्याकडे स्टँड आहे, तेव्हा मला माहित आहे की कोणाशी संपर्क साधावा!".

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement