Rahul Dravid Viral Video: राहुल द्रविड एनसीए ग्राउंड स्टाफसोबत स्ट्रीट क्रिकेट खेळताना दिसले, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Rahul Dravid: सध्या राहुल द्रविड बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. दरम्यान, राहुल द्रविडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Rahul Dravid Playing Gully Cricket With NCA Ground Staffs: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक, राहुल द्रविड यांनी अलीकडेच टीम इंडियाला टी-20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद मिळवून देण्यात मोठे योगदान दिले होते. या विश्वचषकासोबत राहुल द्रविडचा (Raul Dravid) कार्यकाळही संपला. त्याचबरोबर माजी फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. सध्या राहुल द्रविड बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. दरम्यान, राहुल द्रविडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राहुल द्रविड नॅशनल क्रिकेट अकादमीच्या ग्राउंड स्टाफसोबत स्ट्रीट क्रिकेट खेळताना दिसत आहे. राहुल द्रविडने जीन्स आणि टी-शर्ट घातला आहे. यावेळी राहुल द्रविडने गोलंदाजीतही हात आजमावला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)